Uday Samant : रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
महायुतीच्या सरकारमध्ये पालकमंत्रीपदावरून सध्या रस्सीखेच सुरू असलेली पाहायला मिळते. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात त्याला अपवाद पाहायला मिळतोय. रत्नागिरीचं पालकमंत्रीपद शिवसेनेला देण्यावर भाजपची सहमती असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद पुन्हा एकदा उदय सामंत यांच्याकडे जाणार असल्याची चर्चा आहे. कारण रत्नागिरीच्या पालकमंत्रीपदाची माळ पुन्हा एकदा उदय यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीच्या सरकारमध्ये पालकमंत्रीपदावरून सध्या रस्सीखेच सुरू असलेली पाहायला मिळते. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात त्याला अपवाद पाहायला मिळतोय. रत्नागिरीचं पालकमंत्रीपद शिवसेनेला देण्यावर भाजपची सहमती असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मंत्रीपद घेतल्यानंतर लगेचच उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर मला आनंद होईल अशी भावना व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले होते तर उद्धव ठाकरे गटाला काटशह देण्यासाठी राजकारणातील मुरब्बी अशा उदय सामंत यांना शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात पालकमंत्रीपद देऊन शिवसेना एक वेगळा राजकीय डाव या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे उदय सामंत यांचं नाव रत्नागिरी जिल्ह्यात पालकमंत्री पदासाठी पुढे आलेलं पाहायला मिळतेय. दरम्यान, पालकमंत्री पदाचा तिढा प्रजासत्ताक दिनाआधी सुटणार का असा प्रश्न असताना महायुतीत पालकमंत्री पदाचा तिढा कायम असल्याचे समोर येत आहे. तर जवळपास 80 टक्के जागांवर तिन्ही पक्षांचं एकमत झाल्याचे समोर येत आहे.
पालकमंत्र्यांची संभाव्य यादी
- गडचिरोली – देवेंद्र फडणवीस
- नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
- सातारा – शिवेंद्रराजे भोसले
- अहमदनगर – राधाकृष्ण विखे पाटील
- अमरावती – चंद्रकांत पाटील
- अकोला – आकाश फुंडकर
- धुळे – जयकुमार रावल
- लातूर – गिरीष महाजन
- मुंबई उपनगर – मंगलप्रभात लोढा/ आशिष शेलार
- नंदुरबार – अशोक वुईके
- पालघर – गणेश नाईक
- सिंधुदुर्ग- नितेश राणे
- सोलापूर – जयकुमार गोरे
- वर्धा – पंकज भोयर
- ठाणे – एकनाथ शिंदे
- छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाठ / अतुल सावे
- जळगाव – गुलाबराव पाटील / भाजपाचा देखील दावा आहे
- यवतमाळ – संजय राठोड
- हिंगोली – आशिष जैस्वाल
- मुंबई शहर – प्रताप सरनाईक
- नाशिक – दादा भुसे / गिरीश महाजन यांचा देखील दावा
- रायगड – भरत गोगावले / आदिती तटकरे यांचाही दावा कायम
- रत्नागिरी – उदय सामंत
- पुणे – अजित पवार
- बीड – अजित पवार
- कोल्हापूर – हसन मुश्रीफ
- अकोला – माणिकराव कोकाटे/ आकाश फुंडकर यांचाही दावा आहे.
- भंडारा – मकरंद पाटील
- चंद्रपूर – नरहरी झिरवळ