‘या’ खासदाराच्या घरातले 12 जण नदीत कोसळून मृत्युमुखी, केवढी ही दुर्दैवी घटना?
भाजपाच्या खासदाराच्या घरातले तब्बल 12 जण गुजरातमधील दुर्घटनेत एकाच वेळी मृत्युमुखी पडले
अक्षय मंकणी, अहमदाबादः गुजरात (Gujrat) येथील मोरबी पूल (Morbi Bridge) दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय. यात भाजप खासदार मोहनभाई कुंदरिया (Mohanbhai Kundariya) यांनी या घटनेवर अत्यंत दुःखद प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांच्या घरातील 12 जण या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले. टीव्ही 9 च्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. हा पूल नेमका कुणामुळे पडला, नेमकं कोण दोषी आहे, हे शोधून काढलं जाईल, त्यांना सोडणार नाहीत, अशी प्रतिक्रिया कुंदरिया यांनी दिली.
भाजप खासदार मोहनभाई म्हणाले, या अपघातात माझ्या बहिणीचे पतीच्या भावाच्या ४ मली, ३ जावई आमि 5 मुलांचा मृत्यू झालाय. आमच्यासाठी ही खूपच दुर्दैवी घटा आहे.
रविवारी संध्याकाळी मोरबी शहरातील माच्छू नदीवरील झुलता पूल अचानक कोसळला. छटपूजेनिमित्त येथे असंख्य भाविकांची गर्दी जमली होती. अचानक साडे सहा वाजेच्या सुमारास केबल तुटल्याने 500-600 जण नदीत कोसळले.
हेच गुजरातचे खासदार मोहनभाई कुंदरिया-
या घटनेत आतापर्यंत 141 जणांचा मृत्यू झालाय तर 200 पेक्षा जास्त जण गंभीर जखमी आहेत. घटनास्थळ बचाव कार्य सुरु आहे. अजूनही 200 जण बेपत्ता असल्याचं म्हटलं जातंय.
मोहन कुंदरीया म्हणाले, राज्य सरकार, केंद्र सरकारतर्फे मदत केली जातेय. पण ज्यांचे प्राण गेलेत, ते परत येणार नाहीत.
देशाचे पंतप्रधानदेखील काल संध्याकाळपासून या घटनेची वारंवार माहिती घेत आहेत. रात्रभर बचावकार्य सुरु होतं. अजूनही सुरु आहेत.
घटनेसाठी दोषी कोण आहेत, याची चौकशी होईल. चौकशी समितीत जे दोषी आढळतील, त्यांना माफी मिळणार नाही, अशी अपेक्षा खासदारांनी व्यक्त केली आहे.
रविवारी संध्याकाळी मोरबी येथील झुलता पूल कोसळल्यानंतर फायर ब्रिगेड, अँब्युलन्स आणि स्थानिक प्रशासनाची टीम तत्काळ दाखल झाली. जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि इतर मंत्रीदेखील रात्रीपासून घटनास्थळी उपस्थित आहेत. ब्रिटिश काळातील हा पूल पाच दिवसांपूर्वीच पुनर्निर्माणानंतर नागरिकांसाठी खुला करण्यात आला होता.
एका खासदी कंपनीकडे ब्रिज दुरुस्त करण्याचे काम देण्यात आले होते. ७ महिन्यांनंतर हे पुनर्निर्माणाचे काम पूर्ण झाले होते. मात्र नगरपालिकेकडून या पूलाला फिटनेस सर्टिफिकेट देण्यात आले नव्हते, अशीही माहिती समोर आली आहे.