Special Report | गुलाबराव 'डाकू म्हणाताच, Eknath Khadse कडून 'चोरा'ची उपमा -tv9

Special Report | गुलाबराव ‘डाकू” म्हणाताच, Eknath Khadse कडून ‘चोरा’ची उपमा -tv9

| Updated on: Feb 21, 2022 | 9:54 PM

राज्यात जरी महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी पक्षातल्या नेत्यांमध्ये अंतर्गत वाद असल्याचे वारंवार दिसून आले आहे. तसेच विरोध पक्षातील अनेक नेत्यांनी देखील याबाबत राज्य सरकारवरती टीका केल्याची पाहायला मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार असल्यामुळे माझ्यावर अन्याय झाल्याचे म्हटले होते.

जळगाव – राज्यात जरी महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी पक्षातल्या नेत्यांमध्ये अंतर्गत वाद असल्याचे वारंवार दिसून आले आहे. तसेच विरोध पक्षातील अनेक नेत्यांनी देखील याबाबत राज्य सरकारवरती टीका केल्याची पाहायला मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार असल्यामुळे माझ्यावर अन्याय झाल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर असं म्हणतं त्यांनी शिवसेना नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर देखील एकनाथ खडसे यांनी टीकास्त्र सोडले होते. त्यामुळे दोन नेत्यांमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला होता. अनेक दिवसांपासून जळगावमध्ये गुलाबराव पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात वाद असल्याची चर्चा होती. परंतु दोन्ही नेत्यांनी कार्यक्रमात एकमेकांवर टिका केल्याने दोघांमधील वाद पुन्हा एकदा राज्याच चर्चेचा ठरणार आहे. एकनाथ खडसे नेहमी आपल्या विनोदी बोलण्यातून इतर नेत्यांना चिमटा काढत असतात परंतु गुलाबराव पाटील यांना हा चिमटा जोरदार लागला असल्याने त्यांनी एकनाथ खडसे यांना थेट चॅलेंज केले आहे.