आम्ही एका बापाची औलाद, गद्दारी कधी…; गुलाबराव पाटलांचा भाजप नेत्यांना टोला
लोकसभा हे आपल्यासाठी लग्न आहे. पण या लग्नात आपल्याला आपला साखरपुडा करून घ्यायचा आहे. योगायोगाने त्यांच्या निवडणुका लागल्या आहेत. मात्र आपल्याला आपली तयारी करून घ्यायची आहे, असे म्हणत खोचक भाष्य गुलाबराव पाटलांनी केले आहे. तर शिंदे गटाच्या मेळाव्यात भाषण करताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजप नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला
जळगावातील शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यात भाषण करताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजप नेत्यांवर जोरदार हल्लाबोल करत टोला लगावल्याचे पाहायला मिळाले. भाजपचा उमेदवार कोण आहे? आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही…. आपण एकनिष्ठपणे काम करणार आहोत. अनेकांनी मागचे अनुभव सांगितले, विधानसभेत भाजपने आपल्या समोर उमेदवार उभे केले. मात्र भाजपच्या वरच्या नेत्यांना शब्द दिला आहे. पुढे ते असेही म्हणाले की, आम्ही एका बापाची औलाद आहे, आम्ही कधी गद्दारी करणार नाही… आम्ही आमचे काम करू या शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपच्या नेत्यांना टोला लगावला आहे. लोकसभा हे आपल्यासाठी लग्न आहे. पण या लग्नात आपल्याला आपला साखरपुडा करून घ्यायचा आहे. योगायोगाने त्यांच्या निवडणुका लागल्या आहेत. मात्र आपल्याला आपली तयारी करून घ्यायची आहे, असे म्हणत खोचक भाष्यही गुलाबराव पाटलांनी केले आहे.