लग्नात लग्नासारखं, मौतीत गेलं तर मौतीसारखं; 10 किमीवर बदलावं लागतं, गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले?
लग्नात गेले तर लग्नासारखं, मौतीत गेलं तर मौती सारखं आणि वाढदिवसाला गेले तर हॅपी बर्थडे टू यू... असं वागावं लागत. समोरच्याचा मूडवर आम्हाला आमचा मूड ठेवावा लागतो. आमच्यासारखे शिका आम्ही कसं पडलो की पुन्हा तयारी करतो, असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात बोलत असताना म्हटले.
जळगाव, २३ फेब्रुवारी २०२४ : महसूल विभागाची कशी स्पर्धा घेता, तशी महसूल आणि पुढाऱ्यांची पण स्पर्धा घेतली पाहिजे कारण आम्ही कमी नाहीये. म्हणजे दिवसभर आम्ही नाटकातल्या पात्राप्रमाणे पात्र निभावत असतो. दर दहा किलोमीटरवर नाती बदलते. त्याप्रमाणे दर दहा किलोमीटरवर आम्हाला बदलावा लागतं. लग्नात गेले तर लग्नासारखं, मौतीत गेलं तर मौती सारखं आणि वाढदिवसाला गेले तर हॅपी बर्थडे टू यू… असं वागावं लागत. समोरच्याचा मूडवर आम्हाला आमचा मूड ठेवावा लागतो. आमच्यासारखे शिका आम्ही कसं पडलो की पुन्हा तयारी करतो, असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात बोलत असताना म्हटले.
राजकीय आयुष्यात येण्याच्या आधी मी नाटक, गाण्यात सर्वात पुढे असायचो, मात्र हलाकीच्या परिस्थितीमुळे मी त्याकडे जाऊ शकलो नाही. त्या परीक्षेत नापास झालो मात्र राजकीय परीक्षा पास झालो. आमच्या स्पर्धा घ्यायला हव्यात, आम्ही पण कमी नाही, नाशिक विभागीय महसूल क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी गुलाबराव पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केली. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा… हुकला तो संपला.. अशी सुनील गावस्कर यांची कविता सुद्धा यावेळी भाषणात गुलाबराव पाटील यांनी ऐकवली.