Vinayak Mete: विनायकरावांचं जाणं मनाला चटका लावणारं, मराठा समाजाचं मोठं नुकसान- गुलाबराव पाटील

Vinayak Mete: विनायकरावांचं जाणं मनाला चटका लावणारं, मराठा समाजाचं मोठं नुकसान- गुलाबराव पाटील

| Updated on: Aug 14, 2022 | 10:52 AM

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete Passed Away) यांचं निधन झालं आहे. आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास त्यांच्या गाडीला अपघात झाला. पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर त्यांच्या गाडीला अपघात झाला. खोपली इथल्या बातम बोगद्याजवळ हा अपघात झाला. आज मराठा समन्वय समितीची आज दुपारी बैठक होती. त्यासाठी ते मुंबईकडे येत होते. यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यात ते […]

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete Passed Away) यांचं निधन झालं आहे. आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास त्यांच्या गाडीला अपघात झाला. पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर त्यांच्या गाडीला अपघात झाला. खोपली इथल्या बातम बोगद्याजवळ हा अपघात झाला. आज मराठा समन्वय समितीची आज दुपारी बैठक होती. त्यासाठी ते मुंबईकडे येत होते. यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यात ते गंभीररित्या जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे. त्यांच्या जाण्यावर विविध स्तरातून आदरांजली व्यक्त केली जात आहे. गुलाबराव पाटील यांनीदेखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Published on: Aug 14, 2022 10:50 AM