शरद पवार यांच्यासोबत एकत्र प्रवास केल्यानंतर गुलाबराव पाटील म्हणाले…
VIDEO | शरद पवार यांच्यासोबत एकाच ट्रेनने प्रवास केल्यानंतर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली, म्हणाले, 'पवारांशी एक तास चर्चा...'
मुंबई : राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकाच रेल्वे गाडीतून प्रवास केल्याचं समोर आलं आहे. या दोन्ही नेत्यांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोन्ही नेते राजधानी एक्सप्रेसने जळगावच्या दिशेने रवाना झालेत. शरद पवार हे राष्ट्रवादी ग्रंथालय सेलच्या कार्यक्रम निमित्ताने जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तर गुलाबराव पाटील हे कॅबिनेटची बैठक आटोपून जळगावला रवाना होताना दोघांनी एकाच ट्रेनने प्रवास केल्याचं समोर आलं आहे. याप्रवासानंतर गुलाबराव पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली. शरद पवार हे राजकारणातील आदर्श व्यक्तिमत्त्व आहेत, मुंबई ते जळगाव रेल्वे प्रवासात त्यांच्याशी एक तास चर्चा करण्याची संधी मला प्राप्त झाली. त्यात शेती, जळगाव जिल्ह्यातील योजना या विषयावर सकारात्मक चर्चा झाल्याची प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिलीय. काल मुंबईहून जळगावला येताना गुलाबराव पाटील यांची शरद पवार यांची राजधानी एक्स्प्रेसच्या बर्थ मध्ये भेट झाली असल्याचे त्यांनी म्हटले.