संजय राऊत मुंबईपुरतं भांडं, केवळ तिथेच वाजतं, शिंदे गटातील मंत्र्याचं ‘त्या’ टीकेवर प्रत्युत्तर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजस्थान दौऱ्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे. तर संजय राऊत हे मुंबईपुरतंच भांडं आहे, त्यामुळे तिथेच वाजायचं असतं, त्यांना राजस्थान काय कळेल, त्यांच वय तेवढी बुध्दी, या शब्दात शिंदे गटाच्या मंत्र्याचं प्रत्युत्तर
मुंबई, २३ नोव्हेंबर २०२३ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजस्थान दौऱ्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे, अमेरिका आणि फ्रान्समध्ये निवडणुका आहेत, तिकडेही त्यांना सभा घ्याव्या लागतील, इकडे पालिका निवडणुका आहेत, आणि ते तिकडे राजस्थानमध्ये प्रचार करायला चालले आहेत, असं संजय राऊत म्हटलं आहे, या टीकेवरुन मंत्री गुलाबराव पाटील यांनी राऊत यांना जोरदार उत्तर दिलं आहे. तर संजय राऊत हे मुंबईपुरतंच भांडं आहे, त्यामुळे तिथेच वाजायचं असतं, त्यांना राजस्थान काय कळेल, त्यांच वय तेवढी बुध्दी, या शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेचा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार शब्दात समाचार घेतला आहे.
Published on: Nov 23, 2023 11:04 PM
Latest Videos