मनिषा कायंदेंच्या बंडावर गुलाबराव पाटील म्हणाले, “ठाकरे गटात आमदारांवर अन्याय होतोय”
विधान परिषदेच्या आमदार यांनी काल शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. काल सकाळपासून त्यांच्या जाण्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यांचा फोनही नॉट रिचेबल येत होता. यावरून शिवसेनेचे विधानसभेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जळगाव : विधान परिषदेच्या आमदार यांनी काल शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. काल सकाळपासून त्यांच्या जाण्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यांचा फोनही नॉट रिचेबल येत होता. यावरून शिवसेनेचे विधानसभेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “ठाकरे गटातून मनिषा कायंदे या शिंदेंच्या शिवसेनेत येत आहेत, म्हणजे ज्याप्रकारे विधानसभेच्या आमदारांची नाराजी होती, तशीच आता विधानपरिषदेच्या आमदारांची नाराजी दिसते आहे. स्वतःची आमदारकी सोडून शिवसेनेत शामिल होत आहे याचा अर्थ हा फार मोठा धक्का आहे.आम्ही ज्यावेळेस आमची नाराजी व्यक्त करत होतो त्यावेळेस आमच्यावर वेगवेगळे आरोप झाले. मात्र सध्या असली कुठली परिस्थिती आली की त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागतोय,यावरून असं दिसतंय की त्याच्यावर कुठेतरी अन्याय त्यांच्यावर होतोय”, असं गुलाबराव पाटील म्हणाले.