Special Report | गुलाबराव पाटील यांच्या विधानानं नव्या वादाला आमंत्रण

Special Report | गुलाबराव पाटील यांच्या विधानानं नव्या वादाला आमंत्रण

| Updated on: Dec 19, 2021 | 8:46 PM

महाराष्ट्रात सध्या नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. शिवसेनेचे नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना बोदवड नगरपंचायत प्रचार भरसभेत डिवचलं आहे.

महाराष्ट्रात सध्या नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. शिवसेनेचे नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना बोदवड नगरपंचायत प्रचार भरसभेत डिवचलं आहे. माझ्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे केल्याचं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. गुलाबराव पाटील यांनी बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत विरोधकावर जोरदार टीका केली. माझे तीस वर्ष राहून चुकलेल्या आमदारांना चॅलेंज आहे. त्यांनी माझ्या मतदारसंघात येऊन पाहावं की मी काय विकास केला. हेमा मालिनीच्या गाला सारखे रस्ते मी केले. तुम्ही महाराष्ट्राला काय गुण शिकवता, असा सवाल देखील गुलाबराव पाटील यांनी केलाय.