Maratha Reservation : बीडमध्ये शाळा बंदचे आदेश, ‘त्या’ अधिकाऱ्याला निलंबित करा, गुणरत्न सदावर्ते यांची मागणी
आज मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये इशारा सभा आहे. अल्टिमेटमआधी जरांगे पाटील यांची ही अखेरची सभा असणार आहे. त्यामुळे या सभेत ते नेमकं काय बोलणार? या आंदोलनाची पुढील दिशा काय ठरणार? याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
मुंबई, २३ डिसेंबर २०२३ : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरचा अल्टिमेटम दिला आहे. हा अल्टिमेटम उद्या संपणार असून त्यापूर्वी आज मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये इशारा सभा आहे. अल्टिमेटमआधी जरांगे पाटील यांची ही अखेरची सभा असणार आहे. त्यामुळे या सभेत ते नेमकं काय बोलणार? या आंदोलनाची पुढील दिशा काय ठरणार? याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. यापार्श्वभूमीवर बीडमध्ये शाळा बंदचे आदेश देण्यात आले आहे. तर यावरून वकील गुणरत्न सदावर्ते यांनी भाष्य केले आहे. सदावर्ते म्हणाले, ‘बीडमध्ये शाळा बंदचे पत्र काढून शिक्षणाधिकाऱ्याने आदेश दिले आहेत. हे अधिकारी असं का वागताय? यापूर्वीही जालना येथे सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्याचीच पुनरावृत्ती बीडमध्ये झालीये. शाळा बंदचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करा. ‘