Gunaratna Sadavarte : ‘तुझ्यात दम आहे…’, गुणरत्न सदावर्तेंकडून एकनाथ खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार, प्रकरण काय?
वकील गुणरत्न सदावर्ते यांनी एकनाथ खडसे यांच्याविरोधात महिला आयोगात तक्रार दाखल केली. राज्य महिला आयोग, राष्ट्रीय महिला आयोग आणि राज्यपाल यांच्याकडे तक्रार दाखल केली असल्याचे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले.
वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून एकनाथ खडसे यांच्याविरोधात महिला आयोगात तक्रार दाखल करण्यात आली आहे. महिलांचा अवमान केल्याप्रकरणी एकनाथ खडसे यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली. दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांनी महिला आयोगात तक्रार दाखल केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘गुणरत्न सदावर्ते म्हणजे बेगानी शादी में अब्दुला दीवाना…’, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी खोचक टीका केली. ‘एकनाथ खडसे यांनी सार्वजनिक ठिकाणी महिलांचा अपमान केला. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. म्हणून राज्य महिला आयोग, राष्ट्रीय महिला आयोग आणि राज्यपाल यांच्याकडे तक्रार दिली आहे.’, अशी माहिती गुणरत्न सदावर्ते यांनी दिली. पुढे ते असेही म्हणाले, तू म्हणत होता ना.. तुझ्यात दम आहे ना.. गिरीश महाजन यांना म्हणाला होता ना तुम्ही लावा ईडी मी लावतो सीडी… दोन तीन वर्षातच तुझ्या कुटुंबातील व्यक्ती जेलमध्ये होती, तेव्हा तुझी सीडी कुठे होते? असा सवाल करत एकरी उल्लेखाने सदावर्ते यांनी खडसेंवर हल्लाबोल केला.