MSRTC : दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा ‘तो’ मुद्दा ऐरणीवर, संपावेळचे रान उठवणारे सर्व नेते आता गप्प?
tv9 Marathi Special Report : दोन वर्षापूर्वी ST विलीनीकरणाच्या मागणीवर रान उठवणारे गप्प का? संपावेळचे सगळे नेते विलीनीकरणावरून मवाळ झाले? एकीकडे सरकारने आताच्या सरकारने काय दिलं याचे पाढे वाचताय तर दुसरीकडे सदाभाऊ खोत अनेक मागण्याची पूर्तता न झाल्याचा दावा करताय.
मुंबई, ५ नोव्हेंबर २०२३ | वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दोन वर्षांपूर्वी एसटी विलीनीकरणासाठी रान उठवलं होतं. त्याच एसटी कर्मचाऱ्यांवर पुन्हा उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे. दोन वर्षांपूर्वी विरोधात असलेले नेते विलीनीकरणासाठी आंदोलनाला रस्त्यावर उतरले होते. तेव्हाचे विरोधक सत्तेत येऊन दीड वर्ष उलटली तरी विलीनीकरण मात्र झाले नाही. आताच विलीनीकरण करा. इतर सवलतींपेक्षा विलीनीकरणाची घोषणा करा, असं दोन वर्षांपूर्वी म्हणणाऱ्या सदावर्तेंची भाषा ही बदलली. गेल्या दोन वर्षांपूर्वी जे नेते एसटीच्या संपात सहभागी होते. त्यांची भूमिका आता बदलेली दिसतेय. तर आता विलीनीकरणासाठी पुन्हा नवी समिती नेमणं गरजेचं असल्याचे मत सदावर्तेंचं आहे. एकीकडे सरकारने आताच्या सरकारने काय दिलं याचे पाढे वाचताय तर दुसरीकडे सदाभाऊ खोत अनेक मागण्याची पूर्तता न झाल्याचा दावा करताय. बघा काय म्हणताय सदाभाऊ खोत?