Gunaratna Sadavarte : माझी हत्या जरी झाली तरी…. गुणरत्न सदावर्ते भडकले अन् जरांगे पाटील यांच्या अटकेची केली मागणी
VIDEO | मुंबईत मराठा समाजातील मराठा क्रांती मोर्च्याच्या काही तरूणांचा संयम सुटल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी क्रिस्टल टॉवर येथील पार्किंगमध्ये असलेल्या गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड केली. या घटनेनंतर नंतर सदावर्ते यांनी पहिल्यांदा भाष्य केले...
मुंबई, २६ ऑक्टोबर २०२३ | मराठा क्रांती मोर्च्याकडून वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड केली. यावर सदावर्ते यांनी भाष्य केले आहे. गेल्या काही दिवासंपूर्वी गुणरत्न सदावर्ते यांना धमक्या आल्या होत्या. त्यानंतर सदावर्तेंनी मुख्यमंत्र्याची भेट घेतली असल्याचे सांगत ते म्हणाले, गेल्या काही दिवसांपूर्वी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो. त्यावेळी त्यांनी माझ्यासमक्ष ज्वॉईंट पोलीस ऑफ कमिशनरला फोन लावला होता. याचाच अर्थ पोलिसांकडे माहिती होती. तरीही पोलिसांसमोर हल्लेखोरांनी येऊन वाहनांची तोडफोड केली. माझ्या घरात घुसण्याचाही प्रयत्न होता, असा आरोपही त्यांनी केला. पुढे ते असेही म्हणाले, आता जातीजातीत वेगळ्याकरून देशाचे तुकडे केले जाऊ शकतात आणि ही वेळ आली आहे. तर ते तुकडे होऊ नये ही माझी इच्छा आहे. माझी हत्या जरी झाली तरी, माझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबांपर्यंत मी गुणवंतांसाठी लढा सुरूच ठेवणार आहे. तर महाराष्ट्रातील अशा घटनांची शृंखला ही पोलिसांवरील हल्ल्यापासून सुरू झाली आहे आणि आता आज ती माझ्या घरावर आली. ज्या माणसामुळे पोलीस धारातीर्थ पडले. त्या जरांगेंना तातडीने अटक करा. त्यांच्या मुसक्या आवळा त्याच्यावर कारवाई करा, अशी मागणीही त्यांनी केली.