Gunaratna Sadavarte : धनंजय मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, ‘पावशेर पिऊन धमक्या देतो, तुझ्या बापाचं…’
देशमुख कुटुंबाला त्रास झाला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी भरसभेतून थेट जाहीरपणे इशारा दिला. या इशाऱ्यावर सदावर्ते गुणरत्न यांनी भाष्य केले आहे. रस्त्यावर फिरू देणार नाही म्हणजे काय? असा सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. देशमुख कुटुंबाला आलेल्या धमकीबाबतचा मनोज जरांगे यांनी जो इशारा दिलेला होता, त्यावरून सदावर्तेंनी […]
देशमुख कुटुंबाला त्रास झाला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी भरसभेतून थेट जाहीरपणे इशारा दिला. या इशाऱ्यावर सदावर्ते गुणरत्न यांनी भाष्य केले आहे. रस्त्यावर फिरू देणार नाही म्हणजे काय? असा सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. देशमुख कुटुंबाला आलेल्या धमकीबाबतचा मनोज जरांगे यांनी जो इशारा दिलेला होता, त्यावरून सदावर्तेंनी उत्तर दिले आहे. मनोज जरांगे यांच्या घरचे रस्ते नाहीयेत, मनोज जरांगे कोण आहे? जो फिरू देणार नाही म्हणतोय? असा सवाल गुणरत्न सदावर्तेंनी केला आहे. ‘मनोज जरांगे याला मला सांगायचं आहे तुझ्या बापाच्या घरचा रस्ता आहे? महाराष्ट्रातले रस्ते तुझ्या बापाचे नाहीयेत, असं म्हणत एकेरी उल्लेख करत सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केलाय. पुढे ते असेही म्हणाले, केवळ मंत्री धनंजय मुंडे हे भटक्या विमुक्त समाजातून येतात म्हणून अशा धमक्या.. रस्त्याने फिरू देणार नाही. दुसऱ्या एखाद्या उच्च जातीच्या मंत्र्यावर जर हे बोललं गेलं तर ताबडतोब पोलीस प्रशासनाने कारवाई केलेली आहे. हे अगोदर आम्ही पाहिलेलं आहे, असेही सदावर्ते म्हणाले.