Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांना अटक करा, जालन्यातील सभेला विरोध दर्शवत कुणाची मागणी?
VIDEO | गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मनोज जरांगे पाटील यांची संवाद यात्रा सुरू होती. ठिकठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत केल्याचे पाहायला मिळाले. या संवाद यात्रेची सांगता १४ ऑक्टोबर रोजी जालन्यातील अंतरवाली सराटी या गावात होणार आहे. अशातच कुणी सभेला दर्शविला विरोध?
मुंबई, १३ ऑक्टोबर २०२३ | गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मनोज जरांगे पाटील यांची संवाद यात्रा सुरू होती. मनोज जरांगे पाटील यांची पहाटे, मध्यरात्री होणाऱ्या सभेला देखील मराठ्यांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. तर ठिकठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत केल्याचे पाहायला मिळाले. तर या संवाद यात्रेची सांगता १४ ऑक्टोबर रोजी जालन्यातील अंतरवाली सराटी या गावात होणार आहे. यावरूनच वकील गुणरत्न सदावर्ते यांनी भाष्य केले आहे. मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्याची मागणी केली जात आहे. मनोज जरांगे पाटील यांना अटक करा, उद्याची सभा ही हिंसक होईल, असे म्हणत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मागणी केली आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी छत्रपती संभाजीनगर पोलिसांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना उद्याच्या सभेसाठी परवानगी देऊ नये, असेही म्हटले आहे. अशी मागणी करत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला विरोध दर्शविला आहे.