Gunratna Sadavarte : ‘अंजली दमानियांना जे करायचं ते करू द्या, ते कुठल्याही…’, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
बिड येथील अधिकाऱ्यांवर एकाच समाजातील असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. बिडमधील सर्व अधिकारी मर्जीतले, ते दुसऱ्यांना काय न्याय देणार? असा आक्रमक सवालही अंजली दमानिया यांनी केला आहे.
बीड येथील अधिकाऱ्यांवर एकाच समाजातील असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. बिडमधील सर्व अधिकारी मर्जीतले, ते दुसऱ्यांना काय न्याय देणार? असा आक्रमक सवालही अंजली दमानिया यांनी केला आहे. तर अंजली दमानिया यांना जे करायचे आहे ते करू द्या. अंजली दमानिया कुठल्याही संवैधानिक पदावर नाहीत असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय.अंजली दमानिया म्हणाल्या, जेव्हा बीडला गेले आणि तिथली परिस्थिती बघितली, तिथल्या ऑफिसर्सचे मी सगळे डिटेल्स घेतले, त्या लिस्टमध्ये मी बघितलं, झाडून सगळेच्या सगळे वंजारी होते. मुंडे, गोपीनाथ मुंडे असल्यापासून पूर्ण वंजारी समाजातल्या लोकांना पोलिसात भरती केली गेली, शासनात भरती केली गेली, मग हळूहळू त्यांना बीडकडे आणण्यात आलं आणि आत्ताच्या घटकेला हिंमतच नाहीये कोणाची की त्यांच्याविरुद्ध कोणी कारवाई करेल. इथे हे मर्जीतले पण आहेत, समाजातले पण आहेत, तर हे इतर समाजाच्या लोकांबरोबर काय न्याय करणार? असा सवाल अंजली दमानिया केला. यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आपली प्रतिक्रिया देत दमानिया यांच्यावर हल्लाबोल केला आहे.