ज्ञानवापी मशीदीप्रकरणी पुढील सुनावणी 26 मे रोजी

ज्ञानवापी मशीदीप्रकरणी पुढील सुनावणी 26 मे रोजी

| Updated on: May 24, 2022 | 4:00 PM

सध्या संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलेल्या ज्ञानवापी मशीदीप्रकरणी (Gyanvapi Masjid Case) पुढील सुनावणी 26 मे रोजी होणार आहे. आता पक्षकारांच्या हाती यात काही व्हिडिओ आणि फोटो लागल्याचे सांगण्यात येत आहे.

वाराणसी : सध्या संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलेल्या ज्ञानवापी मशीदीप्रकरणी (Gyanvapi Masjid Case) पुढील सुनावणी 26 मे रोजी होणार आहे. आता पक्षकारांच्या हाती यात काही व्हिडिओ आणि फोटो लागल्याचे सांगण्यात येत आहे. आज पुन्हा कोर्टात दोन्ही बाजुंनी घमासान युक्तीवाद झाला आहे. अयोध्येतील बाबरी (Babri)  मशीदीप्रमाणे आता हे प्रकरण गाजताना दिसत आहे. न्यायालयाने दोन्ही पक्षांना एका आठवड्यात ज्ञानवापीच्या सर्वेक्षण अहवालावर आक्षेप नोंदवण्यास मुदत दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानवापी प्रकरणाशी संबंधित सर्व याचिका सत्र न्यायालयातून जिल्हा न्यायालयात वर्ग करण्याचे आदेश दिले होते. सोमवारी जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेशा यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे 45 मिनिटं ऐकल्यानंतर निकाल राखून ठेवला होता.