Aryan Khan | आर्यन प्रकरणात हॅकर मनिष भंगाळेची एन्ट्री, पुराव्याशी छेडछाड करण्यासाठी 5 लाखांची ऑफर
मनिषने सांगितले की, माझ्या इथे जळगावला 6 ऑक्टोबरला दोन जण आले होते. आलोक जैन आणि शैलेश चौधरी असं त्यांचं नाव आहे. त्यांनी सीडीआरचं काम सांगितलं. त्याने काही नंबर सांगितलं. त्यातील एक नंबर त्यांच्या मोबाईलमध्ये पूजा ददलानी म्हणून सेव्ह होतं. त्यांच्याकडे आणखी काही नंबर होते.
मुंबई : आर्यन प्रकरणात आता हॅकर मनिष भंगाळेची एन्ट्री झाली आहे. पुराव्यांची छेडछाड करण्यासाठी पाच लाखांची ऑफर दिल्याचा दावा मनिषने केला आहे. मनिषने सांगितले की, माझ्या इथे जळगावला 6 ऑक्टोबरला दोन जण आले होते. आलोक जैन आणि शैलेश चौधरी असं त्यांचं नाव आहे. त्यांनी सीडीआरचं काम सांगितलं. त्याने काही नंबर सांगितलं. त्यातील एक नंबर त्यांच्या मोबाईलमध्ये पूजा ददलानी म्हणून सेव्ह होतं. त्यांच्याकडे आणखी काही नंबर होते. तसेच त्यांनी आपल्याकडे एक व्हाट्सअॅपचॅट आहे. ते मॉडीफाय करुन टाका, आम्ही जे कंटेट सांगू ते टाका, असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या मोबाईलमध्ये जी फाईल या संदर्भातील होती ती आर्यन खान व्हॉट्सअॅप चॅट या नावाने होती. त्यांनी प्रभाकर साईल नावाचे डमी सीमकार्ड काढून देण्यास सांगितला. तसेच यासाठी पाच लाख देऊ असं सांगितलं. तसेच मुंबईत भरपूर काम देऊ. मोठमोठे केंद्रीय मंत्री आमच्या संपर्कात आहेत. तुमची लाईफ बनून जाईल, असं सांगितलं. हा सगळा प्रकार मला विचित्र वाटला. त्यांनी मला दहा हजार रुपये दिले. मी ते घेऊन निघून आलो. मी त्यांचे नंबर ट्रू कॉलरला चेक केलं तर सॅम डिसूजा म्हणून दिसलं. याबाबत मी मुंबई पोलिसांना, केंद्रीय गृहमंत्रालय तसेच महाराष्ट्र गृहमंत्रालयाला पाठवलंय, असे मनिष भंगाळेने म्हटले आहे.