अमरावतीत रवी राणा यांच्या घरासमोर शिवसैनिक धडकले; हनुमान चालीसावरून वातावरण तापलं
अमरावती : शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते रवी राणा (Ravi Rana) यांच्या घरावर धडकले. घरात घुसण्याचा शिवसैनिकांनी प्रयत्न केला. पोलिसांनी शिवसैनिकांना अडवले. आमदार रवी राणांच्या घराजवळ रवी राणांच्या कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा सुरू केला.
अमरावती : शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते रवी राणा (Ravi Rana) यांच्या घरावर धडकले. घरात घुसण्याचा शिवसैनिकांनी प्रयत्न केला. पोलिसांनी शिवसैनिकांना अडवले. आमदार रवी राणांच्या घराजवळ रवी राणांच्या कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा सुरू केला. हातात हनुमानाची प्रतिमा घेऊन ते उभे आहेत. राणा यांच्या निवासस्थानाच्या दिशेने शिवसैनिकांचा मोर्चा निघाला. या मोर्चात मोठ्या प्रमाणात महिला व शिवसैनिक सहभागी आहेत. अमरावतीत हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) प्रकरणावरुन वातावरण तापले. आज शिवसैनिक राणा यांच्या घरासमोर हनुमान चालीसा वाचण्याचा इशारा दिला. राणा यांच्या घरासमोर व कार्यालयासमोर पोलिसांचा (Amravati Police) तगडा बंदोबस्त करण्यात आलाय. पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेतले. बॅरिकेट्स लावून सर्व शिवसैनिकांना हलविलं.
Latest Videos