Supriya Sule : सुप्रिया सुळेंकडू पंतप्रधान मोदींसह दिग्गजांना हापूस भेट, महाराष्ट्राचा वसा आणि वारसा म्हणून भेट

Supriya Sule : सुप्रिया सुळेंकडू पंतप्रधान मोदींसह दिग्गजांना हापूस भेट, महाराष्ट्राचा वसा आणि वारसा म्हणून भेट

| Updated on: May 01, 2022 | 5:13 PM

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, विविध राज्यातील मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्र्यांसह दिग्गजांना हापूस आंबा पाठवला आहे. हा महाराष्ट्राचा वसा आणि वारसा म्हणून भेट दिल्याचं त्या यावेळी म्हणाल्यात.

मुंबई : आज महाराष्ट्र दिन (Maharashtra din) आहे. आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं. यावेळी त्यांनी देशभरातील 200 दिग्गजांना देवगडचा हापूस आंबा (Hapus Amba) भेट म्हणून पाठवला आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा देखील समावेश आहे. हा हापूस आंबा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, विविध राज्यातील मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्र्यांसह दिग्गजांना पाठवला आहे.

 

 

Published on: May 01, 2022 05:12 PM