नागपूर APMC मार्केटमध्ये शेतकऱ्यांची लूट, किती मिळतोय पिकांना दर?

नागपूर APMC मार्केटमध्ये शेतकऱ्यांची लूट, किती मिळतोय पिकांना दर?

| Updated on: Mar 17, 2023 | 9:53 AM

VIDEO | केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा हरभऱ्याला किती मिळतोय दर...नागपुरातील APMC मार्केटमध्ये शेतकऱ्यांची का होतेय लूट?

नागपूर : नागपूरच्या कळमना एपीएमसी मार्केटमध्ये शेतकऱ्यांची अक्षरशः लूट होत असल्याचे समोर आले आहे. केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा हरभऱ्याला एक हजार रुपये कमी दर मिळत आह. केंद्र सरकारने हरभऱ्याला ५ हजार ३०० रूपये हमीभाव ठरवून दिला आहे, पण सध्या नागपूरच्या कळमना मार्केटमध्ये हरभऱ्याला ४००० ते ४३०० प्रतिक्विंटल दर मिळताना दिसतोय. त्यामुळे प्रत्येक क्विंटलमागे एक हजार रुपयांची लूट सुरु असल्याचे वास्तव पाहायला मिळत आहे. सरकार नोंदणी करुन मोजक्याच हरभऱ्याची हमीभावानुसार खरेदी करत आहेत. याचा फायदा ९० टक्के शेतकऱ्यांना होत नाही. त्यामुळे पर्यायाने दररोज बाजारात शेतकऱ्यांची लूट होत आहे. तर दूसरीकडे राज्यात अवकाळीमुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली असतानाच बुलढाण्यात शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. बुलढाण्यात हरभरा उत्पादकांसाठी जिल्ह्यात ११ केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत नाफेड तर्फे हमीदराने हरभरा खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात ११ केंद्रांना मान्यता देण्यात आली असून, १४ मार्च ते ११ जूनपर्यंत हरभरा खरेदी सुरु राहणार आहे.

Published on: Mar 17, 2023 09:50 AM