इंदापूर विधानसभेवरुन महायुतीत हमरीतुमरी, हर्षवर्धन पाटील की दत्ता भरणे ?

इंदापूर विधानसभेवरुन महायुतीत हमरीतुमरी, हर्षवर्धन पाटील की दत्ता भरणे ?

| Updated on: Feb 18, 2024 | 8:14 PM

महायुतीत चार पक्षांचे भेंडोळे झाल्याने आता लोकसभा आणि विधानसभा जागांवरुन हमरी तुमरी सुरु झाली आहे. इंदापूर मतदार संघात आता हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे या दोघांमध्ये जुंपली आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांनी जो आम्हाला विधानसभेत मदत करेल त्यालाच आम्ही लोकसभेत मदत करु असा इशा दिला आहे.

इंदापूर | 18 फेब्रुवारी 2024 : महायुतीमध्ये इंदापूर विधानसभा मतदार संघाचा तिडा वाढण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता आणि पूत्र राजवर्धन यांनी रणशिंग फुंकले आहेत. विधानसभेला जो आम्हाला मदत करेल त्यालाच आम्ही लोकसभेत मदत करू असे हर्षवर्धन पाटील यांच्या मुलांनी म्हटले आहे. 2024 इंदापूर विधानसभा हर्षवर्धन पाटीलच लढणार असल्याचे त्यांचे पूत्र राजवर्धन यांनी म्हटले आहे. अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे इंदापूरचे सध्याचे आमदार आहेत. तर यावर आता नवीन जनरेशनला लगेच उत्तर देण्याचे काही कारण नाही असे राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. ‘आम्ही आधी महाआघाडीत होतो. आता महायुतीत आहोत. ह्यांनी मागील तीनही वेळेस शब्द देऊन फिरविलेला आहे. आमची फसवणूक केलेली आहे. आमच्या पाटीत खंजीर खुपसला आहे. या वेळेस जे कोणी उमेदवार असतील आमचं जे कोणी विधानसभेत काम करेल त्यांचे आम्ही लोकसभेत काम करू’, असे हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांनी म्हटले आहे. काही लोक असे गैरसमज पसरवीत आहेत की आता दिल्लीत भाऊंना पद मिळाले आहे, परंतू मी परत त्यांना सांगू इच्छीतो की 2024 विधानसभा निवडणूक आम्ही लढणार आहोत असे राजवर्धन देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

 

Published on: Feb 18, 2024 08:13 PM