हरियाणात भाजप सुसाट तर काँग्रेसची पिछेहाट, कोणाला किती जागांवर आघाडी?
Haryana Assembly Election Result 2024 : हरियाणातील आतापर्यंत जवळपास सर्व 90 जागांचे अंदाज समोर आले आहेत. यामध्ये काँग्रेसने आघाडी घेतली तर भाजपने पण जोरदार मुसंडी मारत सत्तेच्या हॅट्रिकच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भाजप सध्या आघाडीवर आहे. तर काँग्रेस पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. आतापर्यंत हरियाणातील जवळपास सर्व 90 जागांचे अंदाज समोर आले आहेत. यामध्ये भाजप 46, काँग्रेस 37, जेजेपी 00 आणि इतर 07 जागा मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. यानुसार हरियाणात भाजप 47 जागांवर आघाडीवर आहे. हरियाणात 46 हा बहुमताचा आकडा आहे. विशेष म्हणजे सकाळी मजमोजणी सुरू झाली तेव्हा तासाभरातच काँग्रेसने 62 जागांवर हरियाणात आघाडी घेतली होती. तर भाजपला केवळ 17 जागांची आघाडी होती. यानंतर हरियाणात भाजपचा सुपडा साफ होतोय की काय अशी शक्यता वर्तविला जात असताना हरियाणात काँग्रेसची लाट येतेय की काय? असा निष्कर्ष काढणार तेवढ्यातच तासाभरता गेम पलटला अन् भाजपने जोरदार मुसंडी घेतली.
Published on: Oct 08, 2024 12:15 PM
Latest Videos