Haryana Assembly 2024 : विधानसभेत भाजपची हॅट्रिक, कसं जिंकलं हरियाणा? कोणता फॉर्म्युला ठरला हिट?

Haryana Assembly 2024 : विधानसभेत भाजपची हॅट्रिक, कसं जिंकलं हरियाणा? कोणता फॉर्म्युला ठरला हिट?

| Updated on: Oct 09, 2024 | 10:41 AM

जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीचं सरकार आलं आहे तर हरियाणा राज्यात भाजपने तिसऱ्यांदा बाजी मारली आहे. वनसाईड विजयाचा दावा करणाऱ्या काँग्रेसला हरियाणात मोठा झटका बसला आहे.

हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या हरियाणात भाजपचा मोठा विजय झाला. तर जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या खात्यात गेलं. मात्र हरियाणा राज्यात ६० हून अधिक दावा करणाऱ्या काँग्रेसला मोठा झटका बसला. ९० विधानसभेच्या जागेत हरियाणाने स्पष्ट बहुमताच्या पुढे जागा मिळवत हरियाणात ४८ जागा मिळवल्या. तर काँग्रेसने ३७ जागा मिळवल्या यासह आयएनएलडीचे दोन आणि अपक्ष तीन उमेदवार जिंकून आले. विशेष म्हणजे २०१९ च्या तुलनेने यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या ८ जागा अधिक निवडून आल्यात. हरियाणात भाजपच्या मुख्य विजयाची कारणं नेमकी कोणती होती? हरियाणात भाजपने जातीय समीकरण साधलं, काँग्रेसने जवळपास २१ टक्के असलेल्या जाट आणि दलित समुदयावर भर दिला भाजपने ३५ टक्के ओबीसींसह सवर्ण मतदारांवर खास मोर्चा वळवला. दलित आणि जा मतदारांवर निर्भर मायावतींच्या बसपाची आघाडी आणि जेजेपी आघाडी अशा २ वेगवेगळ्या आघाड्यांमुळे मतांचं विभाजन होऊन काँग्रेसला फटका बसला. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Oct 09, 2024 10:41 AM