36 जिल्हे 50 बातम्या | 6.30 PM | 7 November 2021
"एसटी कामगार घर-दार सोडून आपल्या हक्कासाठी आंदोलन करत आहेत, आक्रोश करत आहेत. त्यामध्ये लक्ष घालायचं सोडून हे सपना चौधरीला आणून ठुमके लावायला सांगतात, अशी टीका विनायक मेटे यांनी धनंजय मुंडेंवर केली
सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात दिवाळीत स्नेहमीलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रसिद्ध हरियाणवी डान्सर आणि ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री सपना चौधरी हिने ठुमके लगावले. या डान्सचे व्हिडीओ समोर आल्यानंतर शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. सामाजिक मंत्र्यांचं भान हरवलं आहे, अशी टीका त्यांनी केली.
एकीकडे राज्यात एसटी कर्मचारी, शेतकरी आत्महत्या यासारखे प्रश्न प्रलंबित असताना महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना हे शोभत का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या स्नेहमीलन कार्यक्रमानंतर धनंजय मुंडेंवर टीका होत आहे.
Latest Videos