10 च्या 10 हेडलाईन्स | 10 PM 10 Headlines | 10 PM | 29 March 2022
गेल्या काही दिवसांपासून विविध मागण्यांसाठी वीज कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी अंधार पसरला होता. मात्र आज वीज कर्मचाऱ्यांची ऊर्जामंत्र्यांसोबत बैठक पार पडली. त्यानंतर संप मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून विविध मागण्यांसाठी वीज कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी अंधार पसरला होता. मात्र आज वीज कर्मचाऱ्यांची ऊर्जामंत्र्यांसोबत बैठक पार पडली. त्यानंतर संप मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. ऊर्जामंत्र्यांच्या लेखी आश्वसनानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. बदली धोरणासंदर्भात घेतलेला एकतर्फी निर्णय मागे घेण्यात यावा अशीही मागणी वीज कर्मचाऱ्यांनी केली आहे. त्यात तातडीने सूचना देऊन ते बदलण्यात येईल असे आश्वसन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहे. आमच्याशी चर्चा केल्याशिवाय बदली धोरण राबवलं जाणार नाही. तसेच कंत्राटी कामरांना सुरक्षा देण्याबाबत चर्चाही आजच्या बैठकीत झाली आहे.
Latest Videos