Headlines | हेडलाईन्स | 10 PM | 16 February 2022
सुधीर मुनगंटीवार, मोहित कंबोज यांच्यानंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही संजय राऊतांवर जोरदार पलटवार केलाय. राणे यांनी अगदी शेलक्या शब्दांचा वापर करत राऊतांना प्रत्युत्तर दिलंय. त्याचबरोबर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यावरही राणेंची खोचक शब्दात निशाणा साधलाय.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत भाजप नेते आणि अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीवर जोरदार निशाणा साधलाय. त्याचबरोबर राऊत यांनी किरीट सोमय्या, सुधीर मुनगंटीवार आणि मोहित कंबोज यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राऊतांच्या या आरोपांना आता भाजपकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. सुधीर मुनगंटीवार, मोहित कंबोज यांच्यानंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही संजय राऊतांवर जोरदार पलटवार केलाय. राणे यांनी अगदी शेलक्या शब्दांचा वापर करत राऊतांना प्रत्युत्तर दिलंय. त्याचबरोबर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यावरही राणेंची खोचक शब्दात निशाणा साधलाय.
संजय राऊत यांच्या मंगळवारच्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर, एकनाथ शिंदे हे नेते उपस्थित नव्हते. त्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता, कोण ओ मिलिंद नार्वेकर? पूर्वी मातोश्रीमध्ये बॉयचं काम करायचे ते काय? हो… माझ्यासमोरची गोष्ट आहे ओ. मी पाहिलं आहे, बेल मारली की येस सर… काय आणू? असं म्हणणारा आता नेता बनला. काय अपग्रेडेशन स्पीड आहे ओ, अशा शब्दात राणेंनी मिलिंद नार्वेकरांची खिल्ली उडवली.