10 च्या 10 हेडलाईन्स | 10 PM 10 Headlines | 10 PM | 06 April 2022

10 च्या 10 हेडलाईन्स | 10 PM 10 Headlines | 10 PM | 06 April 2022

| Updated on: Apr 06, 2022 | 11:55 PM

ष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्रीय तपास यंत्रणांबाबत आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच तक्रार केलीय. राऊतांवर अन्याय झालाय, त्याची कल्पना पंतप्रधान मोदींना दिल्याची माहिती शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. इतकंच नाही तर महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे टिकणार असा विश्वासही पवारांनी व्यक्त केलाय.

महाविकास आघाडी सरकारमधील नेते, मंत्री, आमदार, खासदारांवरील केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी सुरुच आहेत. आता तर आयकर विभाग थेट ‘मातोश्री’पर्यंत पोहोचलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची संपत्ती आयकर विभागाकडून जप्त करण्यात आलीय. तसंच शिवसेना खासदार संजय राऊत यांची अलिबाग आणि मुंबईतील संपत्ती ईडीने जप्त केलीय. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी विरुद्ध भाजपमधील वाद आता टोकाला पोहोचला आहे. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्रीय तपास यंत्रणांबाबत आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच तक्रार केलीय. राऊतांवर अन्याय झालाय, त्याची कल्पना पंतप्रधान मोदींना दिल्याची माहिती शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. इतकंच नाही तर महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे टिकणार असा विश्वासही पवारांनी व्यक्त केलाय.