Headlines | हेडलाईन्स | 10 PM | 7 February 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर झालेल्या चर्चेत उत्तर दिलं. पंतप्रधान मोदी यांनी कोरोना संकटाच्या काळात पहिल्या लाटेवेळी कामगारांच्या स्थलांतरावरुन महाराष्ट्र, दिल्ली सरकार आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर झालेल्या चर्चेत उत्तर दिलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर विचार प्रकट करणाऱ्या सर्व पक्षांच्या सदस्यांचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करुन केली. ‘देशानं आदरणीय लता दीदीला गमावलं आहे. एवढा मोठा काळ ज्यांच्या आवाजाने देशाला मोहित केलं, देशाला प्रेरित केलं, देशाला भावनांनी भरलं. मी आज आदरणीय लतादीदींना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो’, असं मोदी म्हणाले. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांनी कोरोना संकटाच्या काळात पहिल्या लाटेवेळी कामगारांच्या स्थलांतरावरुन महाराष्ट्र, दिल्ली सरकार आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘कोरोनाच्या पहिल्या लाटेत देश जेव्हा लॉकडाऊनचं पालन करत होतं. who सल्ला देत होतं. तज्ज्ञ म्हणत होते की जो तिथे आहे तिथेच थांबा. कारण माणूस एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी जात असेल आणि तो कोरोना संक्रमित असेल तर त्याच्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. तेव्हा काँग्रेसनं काय केलं, तर मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर उभं राहून लोकांना मुंबई सोडून जाण्यासाठी प्रोत्साहित केलं. कामगार, मजुरांना तिकीटं देण्यात आली. लोकांना प्रेरित करण्यात आलं. महाराष्ट्रात आमच्यावर जो बोज आहे तो जरा कमी व्हावा. तुम्ही जा… तुम्ही उत्तर प्रदेशचे आहात. तुम्ही बिहारचे आहात. जा… तिथे कोरोना पसरवा. तुम्ही हे मोठं पाप केलं. अफरातफरीचं वातावरण निर्माण केलं. कामगार बांधवांना अनेक कठीण प्रसंगात ढकलून दिलं’, अशी घणाघाती टीका पंतप्रधान मोदी यांनी केलीय.