Headlines | हेडलाईन्स | 10 PM | 8 December 2021
तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टरच्या भीषण अपघातात अखेर सीडीएस जनरल बिपिन रावत यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तशी माहिती संरक्षण दलाकडून अधिकृतपणे देण्यात आली आहे. बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि अन्य 11 लष्करी अधिकाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. देशासाठी ही अत्यंत दु:खदायक बातमी आहे. संपूर्ण देश या घटनेमुळे हळहळल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टरच्या भीषण अपघातात अखेर सीडीएस जनरल बिपिन रावत यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तशी माहिती संरक्षण दलाकडून अधिकृतपणे देण्यात आली आहे. बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि अन्य 11 लष्करी अधिकाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. देशासाठी ही अत्यंत दु:खदायक बातमी आहे. संपूर्ण देश या घटनेमुळे हळहळल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून बिपिन रावत आणि अन्य मृत अधिकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.
तामिळनाडूच्या कुन्नूर येथील जंगलात ही दुर्घटना घडली. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जातं. हेलिकॉप्टर दुर्घटनेतील जखमींना जवळच्या वेलिंग्टन बेसमध्ये नेण्यात आलं असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संरक्षण खात्याने या दुर्घटनेची सर्व माहिती घेतली असून या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. भारतीय हवाई दलाने एक ट्विट करून बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं.