Nashik | मुख्याध्यापकाने चावला शिक्षकाचा अंगठा, येवल्यातील नगरसुल शाळेतील प्रकार

Nashik | मुख्याध्यापकाने चावला शिक्षकाचा अंगठा, येवल्यातील नगरसुल शाळेतील प्रकार

| Updated on: Jan 14, 2022 | 12:23 PM

मुख्याध्यापकांनी उपशिक्षक ब्रह्मचैतन्य राजगुरू यांच्या हाताचा अंगठा चावल्याने शिक्षकाचा अंगठ्यातून रक्त येऊ लागल्याने ते जखमी झाले असून या शिक्षकाने मुख्याध्यापक यांच्या विरोधात येवला पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद आहे.

येवला तालुक्यातील नगरसुल येथील शिक्षण प्रसारक मंडळ येथील मुख्याध्यापक सुरेश अहिरे यांनी त्यांच्या शाळेतील उपशिक्षक ब्रह्मचैतन्य राजगुरू या शिक्षकासोबत शाळेतील कॅटलॉक संदर्भात दोघांमध्ये किरकोळ भांडण होऊन या शाळेतील मुख्याध्यापकांनी उपशिक्षक ब्रह्मचैतन्य राजगुरू यांच्या हाताचा अंगठा चावल्याने शिक्षकाचा अंगठ्यातून रक्त येऊ लागल्याने ते जखमी झाले असून या शिक्षकाने मुख्याध्यापक यांच्या विरोधात येवला पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असता मुख्याध्यापका विरोधात येवला पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.