Special Report | डॉ. गोडसेंचं भाकीत खरं?-TV9
कोरोनाची तिसरी लाट किती धोकादायक आणि ही तिसरी लाट कधी ओसरेल, याबाबत आरोग्यतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. डॉ. रवी गोडसे यांनी कोरोनाची तिसरी लाट लवकरच ओसरेल असा अंदाज वर्तवला आहे.
राज्यात सध्या कोरोना आणि ओमिक्रॉनने कहर माजवला असून, कोरोनाची तिसरी लाट किती धोकादायक आणि ही तिसरी लाट कधी ओसरेल, याबाबत आरोग्यतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. डॉ. रवी गोडसे यांनी कोरोनाची तिसरी लाट लवकरच ओसरेल असा अंदाज वर्तवला आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोविड (Corona) रुग्णसंख्या कमी होत आहे असे जे चित्र निर्माण होत आहे ते बरोबर नसून दैनंदिन रुग्ण वाढ झपाट्याने होतच असून जानेवारी शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारी पहिल्या आठवड्यात रुग्णालयांमध्ये रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढेल असे सार्वजनिक आरोग्य विभागाने आपल्या सादरीकरणात सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (cabinet meetign) यावर चिंता व्यक्त करण्यात आली. राज्यात वैद्यकीय ऑक्सिजनचा वापर हळूहळू वाढतो आहे. आता हा वापर दररोज सुमारे 400 मेट्रिक टन इतका वाढला आहे, दररोज 700 मेट्रिक ऑक्सिजन लागला तर राज्यात अधिक कडक निर्बंध लावावे लागू शकतील