Rajesh Tope | 'नवीन वर्ष कोरोनामुक्त करण्यासाठी नियमांचं पालन करा, काळजी घ्या'

Rajesh Tope | ‘नवीन वर्ष कोरोनामुक्त करण्यासाठी नियमांचं पालन करा, काळजी घ्या’

| Updated on: Dec 30, 2021 | 8:51 PM

राज्यात कोरोना(Corona)चे 5 हजार 368 नवे रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे (Dr. Rajesh Tope) यांनी दिलीय. टास्क फोर्ससोबतच्या बैठकीत निर्बंधांबाबत चर्चा झाली. याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

राज्यात कोरोना(Corona)चे 5 हजार 368 नवे रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे (Dr. Rajesh Tope) यांनी दिलीय. मुंबईतली आजची नवी रुग्णसंख्या 3 हजार 928 एवढी झालीय. एक दिवसाआड रुग्णसंख्या दुप्पट होतेय. त्यामुळे प्रत्येकानं कोविड नियमांचं पालन करण्याची गरज असल्याचंही टोपे यांनी सांगितलं. टास्क फोर्ससोबतच्या बैठकीत निर्बंधांबाबत चर्चा झाली. याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नवं वर्ष कोरोनामुक्त करण्यासाठी नियमांचं पालन करा, असं आवाहन त्यांनी केलं.

Published on: Dec 30, 2021 08:50 PM