असं काय घडलं? मंत्री तानाजी सावंत पत्रकारांवर भडकले अन् म्हणाले…
VIDEO | धाराशिवमध्ये असं काय घडलं, ज्यामुळे आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत हे पत्रकारांवर भडकले थेट म्हणाले, '... तर हक्कभंग दाखल करू'
धाराशिव : आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत धाराशिवमध्ये मीडिया अन् पत्रकारांवर भडकले असल्याचे पाहायला मिळाले. बाजार समिती निकालाबाबत माध्यमांनी जे परसेपशन दाखवलं ते थोतांड आहे. माध्यमांनी माहिती घेऊन सत्यता पडताळून पाहिली पाहिजे. अन्यथा तुम्हा माध्यमांविरुध्द हक्कभंग दाखल करावा लागेल असे वक्तव्य केले. भाजप सेनेने धाराशिव जिल्ह्यातील 55 टक्के जागा जिंकल्या मात्र पत्रकार दाखवताय की याला धक्का त्याला धक्का ते चुकीचे आहे. लोकांचं म्हणणं माध्यमांनी मांडावं तुमचं मत लोकांवर लादू नका असेही आक्रमक होत तानाजी सावंत यांनी भाष्य केले आहे. धाराशिव जिल्ह्यातील 8 पैकी 5 बाजार समिती या महाविकास आघाडीच्या ताब्यात आलेल्या आहेत तर तानाजी सावंत यांच्या मतदार संघातील 3 पैकी परंडा आणि वाशी येथे त्याचा पराभव झाला आहे. धाराशिव उस्मानाबाद येथे २०२३ पूर्व तयारी बैठकीत तानाजी सावंत बाजार समिती निकालावर प्रतिक्रिया देत असताना बोलत होते.