Rajesh Tope on Zika | राज्यात झिका विषाणूचा सध्या एकच रुग्ण : राजेश टोपे

| Updated on: Aug 03, 2021 | 1:09 PM

राज्यात झिका विषाणूचा सध्या एकच रुग्ण आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात झिका विषाणूचा सध्या एकच रुग्ण आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी पण घाबरुन जाण्याची गरज नाही, असंही राजेश टोपे म्हणाले.

महाराष्ट्रात झिकाचा विषाणूचा पहिला रुग्ण 30 जुलै रोजी पुणे जिल्ह्यात आढळला आहे. पुरंदर तालूक्यातील बेलसर या ठिकाणी झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळला. पुरंदरला आढळलेल्या झिका व्हायरस बाधित बेलसर या गावाची तपासणी करण्यासाठी आज केंद्रातून पथक येणार आहे.

केंद्राचं पथक पुरंदरच्या बेलसरमध्ये

केंद्राचं तीन जणांचं पथक बेलसर गावाची पाहणी करणार  आहे. दिल्लीतून सर्वेक्षण करण्यासाठी कुटुंब कल्याण मंत्रालयानं हे पथकं पाठवलं आहे. दिल्लीच्या लेडी हार्डींग वैद्यकीय महाविद्यालय स्त्रीरोगतज्ज्ञ, आणि राष्ट्रीय हिवताप संशोधन केंद्रातील किटकतज्ज्ञांचा या पथकात समावेश आहे. बेलसर गावाची पाहणी करुन हे पथक केंद्राला अहवाल देणार आहे.

 

Published on: Aug 03, 2021 01:09 PM