Special Report | लॉकडाऊन की कडक निर्बंध?

| Updated on: Jan 01, 2022 | 9:38 PM

सध्या तरी मुख्यमंत्र्यांसोबत (CM Uddhav Thackeray) झालेल्या चर्चेत लॉकडाऊनचा कोणताही विचार आम्ही तूर्तास केलेला नाही, असं राजेश टोपे यांनी म्हटलंय. मात्र संसर्ग खूपच वाढला आणि 700 मेट्रिक टन ऑक्सिजन कन्झ्मशन (Oxygen Consumption) होऊ लागलं, की ऑटोमॅटिक महाराष्ट्रात लॉकडाऊन लागेल, असं राजेश टोपे यांनी म्हटलंय.

मुंबई : लॉकडाऊनच्या (Lockdown) प्रश्नावर आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागणार का, असा प्रश्न त्यांना उपस्थित करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना राजेश टोपे यांनी मोठं विधान केलं. सध्या तरी मुख्यमंत्र्यांसोबत (CM Uddhav Thackeray) झालेल्या चर्चेत लॉकडाऊनचा कोणताही विचार आम्ही तूर्तास केलेला नाही, असं राजेश टोपे यांनी म्हटलंय. मात्र संसर्ग खूपच वाढला आणि 700 मेट्रिक टन ऑक्सिजन कन्झ्मशन (Oxygen Consumption) होऊ लागलं, की ऑटोमॅटिक महाराष्ट्रात लॉकडाऊन लागेल, असं राजेश टोपे यांनी म्हटलंय. त्यामुळे लॉकडाऊन बाबत गैरसमज ठेवू नका, असंही ते म्हणालेत. लॉकडाऊनची सध्यातरी शक्यता नाही, मात्र निर्बंध अधिक कडक (Strict Restrictions) होतील, असंदेखील राजेश टोपे यांनी म्हटलंय.