hane | ठाण्यात कोविड रुग्णालयाबाहेर आरोग्य कर्मचाऱ्याचं ठिय्या आंदोलन

hane | ठाण्यात कोविड रुग्णालयाबाहेर आरोग्य कर्मचाऱ्याचं ठिय्या आंदोलन

| Updated on: Aug 18, 2021 | 3:50 PM

ठाणे महापालिकेच्या बाळकुंम या ठिकाणी कोविड रुग्णालय येथे 500 हुन अधिक कामगाराना कामावरून कमी केले असल्याने कोविड रुग्णालय बाहेर कामगारांचे ठिय्या आंदोलन सुरू झाले आहे. अचानकपणे कामावरून कमी केल्याचा रोष  डॉक्टर, नर्स,बॉर्ड बॉय ,कामगार मध्ये दिसून येत आहे.

ठाणे महापालिकेच्या बाळकुंम या ठिकाणी कोविड रुग्णालय येथे 500 हुन अधिक कामगाराना कामावरून कमी केले असल्याने कोविड रुग्णालय बाहेर कामगारांचे ठिय्या आंदोलन सुरू झाले आहे. अचानकपणे कामावरून कमी केल्याचा रोष  डॉक्टर, नर्स,बॉर्ड बॉय ,कामगार मध्ये दिसून येत आहे. या साठी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर थोड्याच वेळात भेट देणार असून, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. मागे देखील असेच शेकंडो लोकांना कामावरून कमी केले होते त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पाठपुराव्या मुळे पुन्हा कामावर ठेवण्यात आले. मात्र, आता तीच परिस्थिती समोर आलेली आहे. त्या साठी सर्व कंत्राटी पद्धतीतील  डॉक्टर ,नर्स ,कर्मचारी,वार्ड बॉय असे सर्व जण आपल्या मागण्या मांडण्यासाठी मोठ्या प्रमाणात जमले आहे. तर या बाबत पालिका प्रशासन कसे बघते हेच पाहणे गरजेचे आहे.