Nanded | नांदेडमध्ये डॉक्टर सामूहिक रजेवर गेल्याने आरोग्य व्यवस्थेवर ताण

Nanded | नांदेडमध्ये डॉक्टर सामूहिक रजेवर गेल्याने आरोग्य व्यवस्थेवर ताण

| Updated on: Jan 13, 2022 | 12:52 PM

नांदेड मधील सहाय्यक डॉक्टर काल पासून सामूहिक रजेवर गेल्याने शासकीय रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेवर ताण पडला.

नांदेड मधील सहाय्यक डॉक्टर काल पासून सामूहिक रजेवर गेल्याने शासकीय रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेवर ताण पडला. राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयातील जवळपास 500 सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सेवेत नियमीत करण्याच्या मागणीसाठी सामूहिक रजेवर गेले आहेत. सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर हे विविध शासकीय रुग्णालयात 6 ते 7 वर्षापासून कार्यरत आहेत. कोरोना च्या काळात या डॉक्टर मंडळींनी आपला जीव धोक्यात घालून काम केले. आताही तुटपुंज्या पगारावर हे डॉक्टर्स कोरोना काळात आपला व आपल्या परिवाराचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत.