सत्तासंघर्षाचा तिढा कायम, १६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवरील ठाकरे गटाची सुनावणी लांबणीवर?
VIDEO | शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसाठी ठाकरे गटाच्या निवडणूक आयोगावरील याचिकेवरची सुनावणी लांबणीवर?
मुंबई, ३१ जुलै २०२३ | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात अनपेक्षित घटना घडताना दिसून येत आहे. अशातच राज्यातील सत्तासंघर्षाचा तिढा अद्याप कायम आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रेसंदर्भातील ठाकरे गटाच्या याचिकेवरील सुनावणी लांबणीवर गेल्याचे समोर आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रेसंदर्भातील सुनावणी आज कोर्टात होणार होती. मात्र ही सुनावणी लांबणीवर गेली आहे. कोर्टाच्या आजच्या कामकाजात या प्रकरणाचा समावेश नसल्याचे समोर येत असून आज यावर कोणताही निर्णय येणार नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पुढील सुनावणी कधी होणार? आज कोर्ट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रेसंदर्भातील ठाकरे गटाच्या याचिकेवरील सुनावणीचा विषय आजच्या कामकाजामध्ये घेतं का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.