बुलढाणा जिल्ह्यात कडाक्याच्या उष्णतेची लाट, किती अंशावर पोहोचलं जिल्ह्याचं तापमान?
VIDEO | बुलढाणा जिल्ह्यातील उन्हाच्या चटक्याने नागरिक बेहाल, जिल्ह्यातील तापमानात दिवसेंदिवस होतेय वाढ
बुलढाणा : खामगाव येथील तापमानात दिवसेंदिवस वाढ होवू लागली आहे. जिल्ह्यात उष्णतेची लाट जाणवत आहे. काल १२ मे रोजी खामगाव शहराचे तापमान ४३ अंशावर पोहचले होते. त्यामुळे उन्हाच्या या चटक्याने नागरिकांचे हाल होत आहेत. यावेळी सुरुवातीपासून तापमानात वाढ झालेली दिसून आली नाही, कारण फेब्रुवारी, मार्च या महिन्यात अधून मधून पाऊस पडला तर एप्रिलमध्ये ही अवकाळीने कहर केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे एप्रिलच्या अखेरपर्यंत ढगाळ वातावरणाने हवेत गारवा होता. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मात्र तापमानात वाढ जाणवू लागली आहे. खामगाव शहराचे तापमानाच्या तुलनेत अधिक राहते. त्यामुळे काही दिवसांपासून खामगावचे तापमान ४० शी पार झाले आहे. तर काल खामगाव शहराचे तापमान ४३ अंशांवर पोहचले होते. तर सकाळी ९ वाजेनंतरच उन्हाचा हा चटका नागरिकांचे बेहाल करणार ठरु लागला आहे. तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने त्याचा परिणाम आरोग्यावर होवू लागला आहे. बाहेर पडणे ही नागरिकांना अवघड झालं असल्याने नागरिकांनी घरात राहणंच पसंत केले आहे.