Chandrapur News : सूर्यदेव कोपले! चंद्रपूर ठरला देशातला सर्वात हॉट जिल्हा
Chandrapur Temperature Today : चंद्रपूर जिल्ह्यात आज तापमानाचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे देशातल्या सर्वाधिक तापमानाची नोंद आज चंद्रपूरमध्ये करण्यात आली आहे.
विदर्भात तापमानाचा उद्रेक झाल्याचे बघायाल मिळत आहे. आज देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूरमध्ये झाली आहे. चंद्रपूरमध्ये आज 45.6 अंश सेल्सीयस तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे. गेल्या आठवडाभरापासून चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा तडाखा बघायला मिळत आहे. यामुळे प्रशासनाकडून चंद्रपूरकरांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जातं आहे. ज्याप्रमाणे दिवसा सामान्यपेक्षा जास्त नोंदवण्यात येत आहे, त्याचप्रमाणे रात्रीच्या तापमानात ही वाढ होण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागरिकांनी दुपारी 12 ते 4 वाजताच्या दरम्यान घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
Published on: Apr 22, 2025 02:15 PM