नेत्यापुढंच नुकसानग्रस्त शेतकऱ्यानं फोडला हंबरडा अन् मांडली व्यथा
VIDEO | जळगाव मुक्ताईनगरमध्ये अवकाळी पावसानं शेतकऱ्यांसग नागरिकांची दैना, नुकसानग्रस्त भागात आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून पाहणी
जळगाव : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस, गारपीट होत आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील जळगाव, नांदेड, अमरावती, बीड, नाशिक या जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. शेतकऱ्याच्या हाता-तोंडाशी आलेलं पीकं अवकाळी पावसाने वाया गेल्यानं बळीराजा हवालदिल झाला आहे. अशातच जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर केल्याचे पाहायला मिळत आहे. यासह जळगावच्या मुक्ताईनगर बोदवड परिसरात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिलेत. मुक्ताईनगर तालुक्यात पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा बसल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. आपली व्यथा सांगताना नुकसानग्रस्त शेतकऱ्याने आमदारापुढेच हंबरडा फोडल्याचे पाहायला मिळाले.