Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon Update | मुंबईसह कोकणाला अतिवृष्टीचा इशारा, ऑरेंज अलर्ट जारी

Monsoon Update | मुंबईसह कोकणाला अतिवृष्टीचा इशारा, ऑरेंज अलर्ट जारी

| Updated on: Jun 10, 2021 | 8:45 AM

हवामान खात्याने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि कोकण परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबई आणि कोकणमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबईसह राज्यातील इतर भागात सकाळपासून पावसानं (Mumbai Rains) हजेरी लावली आहे. हवामान खात्याने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि कोकण परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबई आणि कोकणमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पण्यातही आज सकाळपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, कोकणासह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांनाही अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Heavy Rain Alert To Mumbai And Konkan Area Orange Alert)