Mumbai Rain | मुंबईच्या समुद्रात सकाळी 10 वाजता हायटाईड, पालिकेची यंत्रणा सतर्क

Mumbai Rain | मुंबईच्या समुद्रात सकाळी 10 वाजता हायटाईड, पालिकेची यंत्रणा सतर्क

| Updated on: Jul 21, 2021 | 8:57 AM

प्रभादेवी, वरळी, दादर भागात मुसळधार पाऊस. मिठी नदी तुडुंब भरली. आज सकाळपासून मुंबई आणि उपनगराच्या परिसरात वेगवान वाऱ्यांसह पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे.

गेल्या काही दिवसांमधील सततच्या पावसामुळे मिठी नदी सध्या तुडुंब भरून वाहत आहे. अशातच बुधवारी सकाळी 9 वाजून 56 मिनिटांनी समुद्राला मोठी भरती येणार आहे. या काळात पाऊस सुरुच राहिल्यास मुंबई पुन्हा एकदा जलमय होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या 24 वॉर्डांमध्ये यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तत्पूर्वी मंगळवारी मुंबईत पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. रात्री 8.30 वाजेपर्यंत राम मंदिर येथे 78 मिमी असा 24 तासांचा सर्वाधिक पाऊस नोंदवला गेला. कुलाबा येथे कमाल तापमान 31 अंश तर किमान तापमान 25.5 मिमी नोंदवले गेले. तसेच सांताक्रूझ येथे कमाल तापमान 31.1आणि किमान तापमान 25.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पुढील दोन दिवस रायगड, रत्नागिरी येथे तीव्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Published on: Jul 21, 2021 08:53 AM