Akola | अकोल्यात पूल वाहून गेल्याने 8 ते 10 गावांचा संपर्क तुटला, शेतीचंही नुकसान

Akola | अकोल्यात पूल वाहून गेल्याने 8 ते 10 गावांचा संपर्क तुटला, शेतीचंही नुकसान

| Updated on: Jun 30, 2021 | 10:53 AM

अकोला जिल्हातल्या तेल्हारा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाथर्डी येथील पूल वाहून गेलाय. त्यामुळे 8 ते 10 गावांचा संपर्क तुटला असून शेतीचेही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

अकोट राज्य मार्गाचे गेल्या 2 वर्षापासून काम सुरु आहे. त्यामुळे सर्वीच कडे रस्ते खोदून ठेवले आहेत. तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पाथर्डी येथील पूल वाहून गेल्याने जास्तगाव, राणेगावं,भोकर,वरुड, सिरसोली,पाथर्डी आणि टाकळी या गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा मार्ग बनवून देण्यात यावा अशी मागणी गावकरी करीत आहे.

Published on: Jun 30, 2021 10:53 AM