अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, काही भागातील बत्ती गुल | Nashik Rain |

अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, काही भागातील बत्ती गुल | Nashik Rain |

| Updated on: Mar 09, 2022 | 10:38 AM

20 मिनिटे पडलेल्या पावसाने परिसरात रात्री लोकांना चांगला गारवा जाणवला तर उकाड्यापासून सुटका झाली. अचानक झालेल्या पावसामुळे अनेक पीकांवर त्याचा परिणाम होणार आहे. काढणीला आलेल्या पीकांवर पाऊस झाल्याने नेमकं कोणत्या पिकाचं नुकसान झालंय हे उद्याप स्पष्ट झालेलं नाही.

येत्या दोन तीन दिवसात महाराष्ट्रासह (maharashtra) अनेक भागात पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून (Weather department)वर्तवण्यात आली होती. त्यामुळे काल राज्यात अनेक ठिकांणी ढगाळ वातावरण असल्याचे पाहायला मिळाले. अशा वातावरणामुळे हवामानात उकाडा प्रचंड वाढला असल्याने नागरिकांना काल उकाड्याचा प्रचंड त्रास झाला असणार त्याचबरोबर निफाड (niphad) परिसरात दिवसभर आभाळ दाटून आलेलं होत. नागरिकांना काल उकाड्याचा प्रचंड त्रास झाल्याची प्राथमिक माहिती समजत आहे. सायंकाळच्या सुमारात काल परिसरात वादळी वा-यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. 20 मिनिटे पडलेल्या पावसाने परिसरात रात्री लोकांना चांगला गारवा जाणवला तर उकाड्यापासून सुटका झाली. अचानक झालेल्या पावसामुळे अनेक पीकांवर त्याचा परिणाम होणार आहे. काढणीला आलेल्या पीकांवर पाऊस झाल्याने नेमकं कोणत्या पिकाचं नुकसान झालंय हे उद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Published on: Mar 09, 2022 10:38 AM