VIDEO : Pune Rain | Baramati मधील पश्चिम भागात ढगफुटीसदृष्य पाऊस,निरा-बारामती रस्ता वाहतुकीसाठी बंद
गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात काही ठिकाणी पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावल्याचे चित्र बघायला मिळते आहे. बारामतीच्या पश्चिम भागात ढगफुटीसदृष्य पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाल्याचे कळते आहे.
गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात काही ठिकाणी पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावल्याचे चित्र बघायला मिळते आहे. बारामतीच्या पश्चिम भागात ढगफुटीसदृष्य पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाल्याचे कळते आहे. या ढगफुटीसदृष्य पाऊसामुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले असून अनेक रस्ते पुराच्या पाण्यामुळे बंद करण्यात आले आहेत. यामुळे अनेकजण अडकून पडले आहेत. या ढगफुटीसदृष्य पावसामुळे पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
Latest Videos