Special Report | महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी मात्र जिल्ह्यांमधील पावसाची परिस्थिती काय?

Special Report | महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी मात्र जिल्ह्यांमधील पावसाची परिस्थिती काय?

| Updated on: Jul 30, 2023 | 9:50 AM

VIDEO | महाराष्ट्रात पावासाचा जोर कमी तरी काही भागात पूरपरिस्थिती, कोणत्या जिल्ह्यात अद्याप पावसाचं थैमान?

मुंबई, 30 जुलै 2023 | महाराष्ट्रात पावासाचा जोर कमी झाला असला तरी राज्यातील काही भागात अद्याप पूरस्थिती कायम आहे. सतंतधार पावसामुळे बंद केलेला राऊतवाडी धबधबा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. राऊतवाडी धबधब्याचं हे विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यानं कैद केलंय. १५० फूट उंचीवरून कोसळणारा राऊतवाडी धबधबा पर्यटकांचं लक्ष वेधून घेतोय. मुसळधार पावसामुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून हा महाकाय धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता. मात्र आता पावसाचा जोर ओसरल्याने हा बंदीचा निर्णय मागे घेण्यात आलाय. राऊतवाडी धबधबा हा राधानगरी तालुक्यातील प्रसिद्ध धबधबा आहे. या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी हजारो पर्यटक येथे दाखल होत असतात. राऊतवाडी धबधबा कोल्हापूर पासून ५५ किमी अंतरावर आहे. तर राधानगरीपासून फक्त साडेसहा किमी अंतरावर आहे. यासह कोल्हापूरचा कळंबा तलाव ओव्हर फ्लो झालाय. तर दुसरीकडे वसई १३ दिवसांपासून पाण्याखाली असल्याने स्थानिकांनी पाण्यात बसून आंदोलन केले आणि प्रशासनाचा निषेध नोंदविला. इतर भागात काय स्थिती बघा व्हिडीओ…

Published on: Jul 30, 2023 09:38 AM