राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता; या 3 जिल्ह्यांना रेडअलर्ट, कोकणाबाबत हवामान विभागाचा अंदाज काय?
जूनमध्ये मनासारखा पाऊस झाला नव्हता. पण आता जुलै महिन्यात राज्याच्या अनेक जिल्ह्यात पावसाने दमदार सुरूवात केली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई, 20 जुलै 2023 | गेल्या महिन्यात पावसाने पुर्णपणे दडी मारली होती. मात्र त्याच्या आधी काही जिल्ह्यात वळवाने धुमाकूळ घातला होता. मात्र जूनमध्ये मनासारखा पाऊस झाला नव्हता. पण आता जुलै महिन्यात राज्याच्या अनेक जिल्ह्यात पावसाने दमदार सुरूवात केली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर रायगड, पालघर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून पुणे, सातारा, रायगड जिल्ह्यांसाठी रेडअलर्ट जारी करण्यात आला आहे. याचदरम्यान रायगडची स्थिती पाहता येथील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, ठाणे, नाशिक, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे.